लेखक शरद देशपांडे यांना आयुष्यभर भेटलेल्या माणसांचा हा गोतावळा… गंमत म्हणजे ही माणसं आपल्यालाही भेटलेली असतात. म्हणजे खानावळवाल्या मावशी, रस्त्यात थांबवून उगाच गप्पा मारणारे अनोळखी आजोबा, मुलांच्या संसारात मन रमवू पाहणारी एखादी आजी, ऑफिसातला खुनशी कलीग ते अगदी लहानपणापासून घरच्यांनी तयार केलेलं एखादं काल्पनिक पात्र… ह्या सगळ्यांची गोष्ट सांगणारा मराठी पॉडकास्ट… गोतावळा! अभिवाचन - ओम भुतकर. Gotawala is a Marathi slang. It describes people you meet along the way and feel a strong connection with. A Marathi podcast, Gotawala will celebrate stories of people from Sharad Deshpande's life, penned in his inimitable style and narrated by Om Bhutkar.